www.24taas.com, मुंबई
मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ओव्हरब्रीजचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही घटना घडलीय. या प्रकरणी सुपरवायजर आणि इंजिनीअरवर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वेस्टर्न एक्सप्रेस वे आणि विमानतळाला जोडणा-या पुलाचं काम विमानतळ प्राधिकरणाकडं होतं असं सांगत अपघाताची जबाबदारी विमानतळ प्राधिकरणाची असल्याचं सांगितलंय.
पूलाचा भाग कोसळताच ढिगा-याखाली अडकून तीन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय.. तर 6 जण गंभीर जखमी झालेत.. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली... तीस मीटर लांब ब्रीजचा स्लॅब क्रेनच्या मदतीने दोन पिलरवर ठेवण्यात येत होता.. मात्र संतुलन बिघडल्यानं हा स्लॅब खाली कोसळून ही दुर्दैवी घटना घडली... याआधीसुद्धा अशाप्रकारच्या दोन घटना मुंबईत घडल्यात..
मात्र विमानतळ परिसराचा विकास करणाऱ्या जीव्हीके आणि एल एंड टी कंपनीने यातून कोणताही बोध घेतला नसल्याचा आरोप होतो आहे.. घटनेनंतर महापौर सुनील प्रभूंनी तात्काळ घटनास्थळाची धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.. एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु असताना तिथं एकही एँम्ब्युलन्सची सोय नव्हती.