मनसेचा रेडिओ मिर्चीला इशारा, पाकिस्तानी कलाकराचा कार्यक्रम रद्द

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कलाकारांना ४८ तासात देश सोडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला. यानंतर प्रसिद्ध गायक आतिफ असलमचा कार्यक्रम देखील रोखण्यात आला.

Updated: Sep 25, 2016, 02:52 PM IST
मनसेचा रेडिओ मिर्चीला इशारा, पाकिस्तानी कलाकराचा कार्यक्रम रद्द title=

मुंबई : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कलाकारांना ४८ तासात देश सोडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला. यानंतर प्रसिद्ध गायक आतिफ असलमचा कार्यक्रम देखील रोखण्यात आला.

रेडिओ मिर्चीवर पाकिस्तानच्या गायक आतिफ असलम याची मुलाखत होती. पण मनसे कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला. रेडिओ मिर्चीच्या कार्यालयात जावून मनसेने त्यांना इशारा दिला त्यानंतर रेडिओ मिर्चीने आतिफ असलमचा कार्यक्रम रद्द केला.

पाकिस्तानी कलाकारांना मुंबई आणि महाराष्ट्रात काम करू देणार नाही या आमच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितलंय. आमच्या आवाहनानंतर अनेकांनी पाकिस्तानी कलाकारांचं काम बंद केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.