मॉडेल बलात्कार प्रकरणी डीआयजी पारस्कर निलंबित

मॉडेल बलात्कार प्रकरणी अखेर सुनील पारस्कर यांना निलंबित करण्यात आलं आहे. सुनील पारस्कर यांच्या निलंबनावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्कामोर्तब केला आहे. 

Updated: Aug 26, 2014, 11:13 PM IST
मॉडेल बलात्कार प्रकरणी डीआयजी पारस्कर निलंबित  title=

मुंबई : मॉडेल बलात्कार प्रकरणी अखेर सुनील पारस्कर यांना निलंबित करण्यात आलं आहे. सुनील पारस्कर यांच्या निलंबनावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्कामोर्तब केला आहे. 

एका मॉडेलने डीआयजी सुनील पारस्कर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. सुनील पारस्कर यांच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी चौकशीही सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्याच्या गृहमंत्रालयाने डीआयजी सुनील पारस्कर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवला होता. या नंतर मुख्यमंत्र्यांनी निलंबनाचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.