www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत महालक्ष्मी येथे झालेल्या गँगरेप प्रकरणातील आरोपींनी एक दोन नव्हे तर तब्बल ९ गँगरेप केलेत असं पोलीस तपासात उघड झाल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलय. त्यामुळे शक्तिमील कम्पांऊंडमध्ये रेप करण्याऱ्यांची गँगचं सक्रीय होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नवीन अटक केलेल्या सहाव्या आरोपींन हा खुलासा केल्याचं पोलीसांचे म्हणणे आहे.
शक्तिमील कम्पाऊंड मध्ये होती रेप करणार्यांची गँग
एक दोन नाही तर ९ गँगरेप केल्याची आरोपींची तपासात माहिती
आतापर्यंत दोन तरुणींनी केली तक्रार दाखल
काय होती या नराधमांची गँगरेप करण्याची मोडस ओपरेंडी
गेल्या अनेक वर्षांपासून महालक्ष्मी येथील बंद असलेलं हे शक्तिमील कम्पाऊंड गर्दुल्ले आणि गुंडांचा अड्डा झाला होता. २२ ऑगस्टला एका फ़ोटो जर्नालिस्टवर या कम्पाऊंडमध्ये गँगरेप झाला आणि शक्तीमील कम्पाऊंडमध्ये नेमकं काय सुरु असतं हे स्पष्ट झालं. गँगरेप करणाऱ्या आरोपींना अटक झाल्यानंतर शक्तीमील कम्पाऊंड हे रेप करणार्या आरेपींचा अड्डा आहे हे देखील समोर आलं.
या शक्तीमील कम्पाऊंडमधून महालक्ष्मी रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी शॉर्टकट आहे. अनेक मुली या शॉर्टकटने जायच्या तर काही जोडपी या शक्तीमील कम्पाऊंडमध्ये एकांतात काही क्षण घालवण्यासाठी यायचे. याचाच फायदा या नराधमांनी घेतला आणि आपली भुक भागवण्यासाठी 9 तरुणींच्या अब्रुशी खेळले.
हे नराधम या शक्तीमील कम्पाऊंडमध्ये वेशांना घेऊन यायचे. आणि त्याच्यांवर अत्याचार करायचे. चोऱ्या करणे, लोकांना लुटणं अशी दिनचर्या या अशिक्षित नराधमांची होती. पण, वेश्येवर केलेल्या गँगरेपनंतर या नराधमांची हिम्मंत वाढली आणि कचरा वेचण्यासाठी येणार्या तरुणी, वेश्या, कम्पांऊंडचा शॉर्टकट म्हणून वापर करणार्या तरुणी आणि एकांतासाठी येणार्या जोडप्यांना ते आपल्या वासनेचे शिकार बनवू लागले. हे नराधम जोडप्यांचे लपून फोटो काढायचे, इथे झालेल्या खुनाला ती तरुणी जबाबदार आहे अशी भिती दाखवून आणि हे कम्पाऊंड रेल्वेच्या मालकीचं आहे इथं आलातचं कसे या युक्त्यांचा वापर करुन तरुणींना आपल्या वासनेची शिकार बनवायचे.
काही वर्षांपुर्वी या शक्तीमील कम्पाऊंडमध्ये शहीद विजय साळसकर यांनी एका मोठ्या गुंडाला मोठ्या फौज फाट्यासह अटक केली होती. अनेक मोठं मोठे गुंड या शक्तीमील कम्पाऊँडचा आश्रय घ्यायचे असं असतानाही पोलीसांनी या कम्पांऊंडवर नजर न ठेवणं हे मुंबई पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकार्यांना खटलय. आणि त्या दृष्टीने कारवाई कऱण्याचेही पोलीसांनी संकेत दिलेत.
शक्तीमील कम्पाऊंड सारख्या निर्जण स्थळांना वाईट प्रवृत्तीचे लोकं आपला अड्डा बनवतात आणि गीभीर गुन्हे करतात. अशा गुनहयांना आळा बसावा याकरता मुंबई पोलीसांनी मुंबई शहरातील अशी 272 निर्जण स्थळ घोषीत केलीत आहेत. ज्या स्थळांवर जर एखादे जोपडे किंवा तरुणी आढळली तर त्यांच्यावर कलम 188 नुसार कारवाई केली जाणारेये. त्याच बरोबर जागा मालंकांनी जागेची नीट पाहणी केली नाही तर जागा मालकांवरही पोलीस कारवाई करणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.