नवी दिल्ली : आजच्या जमान्यात अनेकांचे एकापेक्षा अधिक बँक खाते आहेत. याला गरज म्हणा किंवा मजबुरी. एका सामान्य माणसासाठी ही अडचण ठरू शकते. पण तुम्ही व्यापारी आहेत किंवा दिवसभरात पैशांची देवाण-घेवाण कोट्यवधीच्या दरम्यान असेल तर तुम्हांला फायदेशीर आहे.
एक ठराविक वेतन मिळण्यासाठी एकापेक्षा अधिक बँक खाते असणार नुकसानदायक होऊ शकते. प्रत्येक बँक आपले खाते सुरू ठेवण्यासाठी एक निश्चित रक्कम ठेवायला सांगते. तसेच या खेरीच बँक खाते सक्रीय करण्यासाठी काही चार्जेस बँक खातेदारांना भरावे लागतात. त्याचे नुकसान खातेदारांना भरावे लागते.
बहुतांशी बँकांमध्ये किमान बॅलन्स ठेवण्याची अट असते. यात बँकेनुसार काही ठराविक रक्कम कायम बँकेत ठेवायला सांगितले जाते. आपण कमी बॅलन्स ठेवला तर तुम्हांला दंड भरावा लागतो. तसेच बँक खाते पण बंद करू शकतात. शहरी भागात ही मर्यादा १० हजार रुपये आहे. वेगवेगळ्या बँकांमध्ये ही रक्कम वेगवेगळी आहे. त्यामुळे आपले एकापेक्षा अधिका बँक खाते असतील तर त्यासाठी तुमचा अधिक खर्च होतो.
सर्व बँका आपल्या सेव्हिंग खात्यासह क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि इतर बँक सेवांसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारणी करतात. यातही ग्राहकाचे नुकसान होते. सर्व बँक खाते सुरू ठेवण्यासाठी सर्व बँकांना हे शुल्क द्यावे लागते. असे नाही केले तर तुमचे बँक खाते बंद होऊ शकते. खाते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हांला आणखी चार्ज द्यावा लागतो.
न्यूनतम बॅलन्स राहू देण्यासाठी तुम्हांला ठराविक रक्कम बँकेत ठेवावी लागते. हा पैसा बँकेत पडून राहिल्याने इतर ठिकाणी गुंतवता येत नाही. शेअर बाजार, म्युचलफंड, फिक्स्ड डिपॉझिट यात पैसे ठेवता येत नाही.
एका पेक्षा अधिक बँक खाते असल्याने आयकर जमा करताना अडचण होते. कागदी घोडे नाचवावे लागतात. आयकर विवरण पत्र भरताना सर्व खात्याची माहिती द्यावी लागते. त्याचे स्टेटमेंट एकत्र देणे डोकेदुखी ठरते.