मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचे भूमीपूजन 26 ऑगस्टला - नायडू

 मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचे भूमीपूजन येत्या 26 ऑगस्टला होईल, अशी घोषणा केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलीय. 

Updated: Aug 22, 2014, 08:46 PM IST
मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचे भूमीपूजन 26 ऑगस्टला - नायडू title=

मुंबई : मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचे भूमीपूजन येत्या 26 ऑगस्टला होईल, अशी घोषणा केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलीय. 

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असून, त्याआधी भूमीपूजन आणि उद्घाटनांचा धडाकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं लावलाय. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात रखडलेल्या पुणे मेट्रोलाही लवकरच मंजुरी देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. 

पुणे मेट्रोचा प्रस्ताव राज्य सरकारकडे परत पाठवण्यात आलाय, असं सांगतानाच याबाबत मुख्यमंत्र्यांची टीका दुर्दैवी आहे, असं नायडू म्हणाले. दरम्यान, ठाण्यातही मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहितीही नायडूंनी यावेळी दिली. 

महाराष्ट्रातील विविध मेट्रो रेल्वे प्रकल्पांबाबत व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सविस्तर चर्चाही झाली. त्यानंतर युतीच्या खासदारांनीही व्यंकय्या नायडूंची भेट घेऊन, विविध मागण्यांचे निवेदन दिले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.