डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता

डेंग्यूंच्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता बघयाला मिळतेयं. डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या घरामध्ये राहणाऱ्या एकूण 13 हजार नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्यात. 

Updated: Sep 28, 2016, 07:00 PM IST
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता title=

मुंबई : डेंग्यूंच्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता बघयाला मिळतेयं. डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या घरामध्ये राहणाऱ्या एकूण 13 हजार नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्यात. 

पण नोटीसा बजावल्यानंतरही योग्य पावलं न उचलणाऱ्य़ा तब्बल 927 जणांवर महानगर दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात खटले दाखल करण्यात आले आहेत.  

डांसाची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेची पथकं शहरात फिरत आहेत. 

अशा पथकांना काही नागरिक आडकाठी करतात.त्यांच्यावरही असे खटले भरण्यात येणार आहेत. पालिकेच्या कायद्यानुसार कलम 381 अंतर्गत आधी डेंग्यूच्या अळ्या रोखण्यासाठी तीन दिवसात पावलं उचलण्याची नोटीस देण्यात येते. 

नागरिकांनी नोटीसीवर कारवाई केली नाही, तर पालिकेला त्यांच्याविरोधात खटले भरण्याची मुभा असते. याच कलमाला अनुसरून मुंबई पालिकेनं 927 जणांवर खटला भरलाय.