मुंबईतल्या या रेल्वे स्टेशनला राम मंदिराचं नाव

मुंबईतल्या वेस्टर्न लाईनवरच्या जोगेश्वरी आणि गोरेगावमधल्या नव्या स्टेशनचं नाव राम मंदिर असणार आहे. 

Updated: Nov 25, 2016, 09:21 PM IST
मुंबईतल्या या रेल्वे स्टेशनला राम मंदिराचं नाव title=

मुंबई : मुंबईतल्या वेस्टर्न लाईनवरच्या जोगेश्वरी आणि गोरेगावमधल्या नव्या स्टेशनचं नाव राम मंदिर असणार आहे. रविवारी जोगेश्वरी आणि गोरेगावमधल्या या नव्या स्टेशनचं उद्घाटन होणार आहे.

ओशिवारामध्ये वेस्टर्न रेल्वेचं हे नवं स्टेशन उभारण्यात आलं आहे. ओशिवारा भागामध्ये प्रसिद्ध असलेल्या राम मंदिरामुळे या स्टेशनचं नाव राम मंदिर असावं अशी मागणी भाजप आणि शिवसेनेनं केली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनं या निर्णयावर टीका केली आहे. आघाडी सरकारनं ओशिवारा स्टेशन बांधायचा निर्णय घेतला होता. याचं काम आत्ता पूर्ण झालं आहे. या स्टेशनचं नाव ओशिवारा ठेवणं अपेक्षित असाताना फक्त महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराचं भांडवल केलं जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.