सबनीसांना धमकी देणाऱ्यांना नितेश राणेंचं प्रत्यूत्तर...

श्रीपाल सबनीस यांच्यावरून निर्माण झालेल्या वादाला आता राजकीय वळण लागलंय. श्रीपाल सबनीस यांच्याविषयी सनातनचे कायदेशील सल्लागार संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या वादग्रस्त ट्वीटला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर पिंपरीमध्ये सबनीसांच्या निषेधाला अधिकच जोर चढलाय.

Updated: Jan 9, 2016, 11:13 AM IST
सबनीसांना धमकी देणाऱ्यांना नितेश राणेंचं प्रत्यूत्तर...  title=

मुंबई : श्रीपाल सबनीस यांच्यावरून निर्माण झालेल्या वादाला आता राजकीय वळण लागलंय. श्रीपाल सबनीस यांच्याविषयी सनातनचे कायदेशील सल्लागार संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या वादग्रस्त ट्वीटला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर पिंपरीमध्ये सबनीसांच्या निषेधाला अधिकच जोर चढलाय.

जसजसं साहित्य संमेलन जवळ येत चाललंय, तसतसा श्रीपाल सबनीस यांच्यावरून सुरू झालेला वाद अधिकच चिघळत चाललाय. सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार संजीव पुनाळेकर यांच्या ट्विटला आता नितेश यांनी उत्तर दिलंय.

दरम्यान, नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत सबनीसांना संरक्षण देण्याची तयारी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी दाखवलीय. तर संमेलननगरी पिंपरीमध्ये श्रीपाल सबनीसांच्या प्रतिकृतीची गाढवावरून धिंड काढण्यात आली. त्यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. सबनीसांच्या माफीवर भाजप अजूनदेखील ठाम आहे.

हा वाद संमेलनापर्यंत निवळण्याची कुठलीही चिन्हं दिसत नाहीत. त्यामुळं यंदादेखील साहित्य आणि संमेलन यांच्यापेक्षा संमेलनाध्यक्षच अधिक चर्चेत आलेत.