आता ऑनलाइन खरेदी करा भाजी आणि फळं !

आता कॉम्प्युटरच्या एका क्लिकनं तुम्हांला घर बसल्या फळं-भाजी मिळू शकणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपल्या नव्या उपक्रमात याची व्यवस्था केलीय. 

Updated: Jun 30, 2014, 01:03 PM IST
आता ऑनलाइन खरेदी करा भाजी आणि फळं ! title=

मुंबई : आता कॉम्प्युटरच्या एका क्लिकनं तुम्हांला घर बसल्या फळं-भाजी मिळू शकणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपल्या नव्या उपक्रमात याची व्यवस्था केलीय. 

या व्यवस्थेनुसार लोकं घर बसल्या ऑर्डर देऊ शकतील आणि त्यांच्या ऑर्डरनुसार फळे- भाजी घरपोच डिलिव्हर केल्या जातील. इंग्रजी वृत्तपत्र 'द इकोनॉमिक टाइम्स'नं या उपक्रमाची माहिती दिली आहे. 

माहितीनुसार, पहिले मुंबईमध्ये ही सुविधा सुरु करणार असल्याचं कंपनीनं सांगितलंय. यामुळं ग्राहकांना त्यांच्या घरी ताजी भाजी आणि फळं सकाळी-सकाळी मिळणार आहेत. अन्य ऑनलाइन रिटेलच्या तुलनेत रिलायन्स रिटेल जास्त वस्तूंचा पुरवठा करते. सध्या तरी दोन प्रमुख ऑनलाइन रिटेलर 'लोकल बनिया डॉट कॉम' आणि 'बिग बास्केट डॉट कॉम' फळांची डिलेव्हरी करत आहेत.
 
रिलायन्सनं या उपक्रमासाठी एका कंपनीसोबत भागीदारी केली आहे. त्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे. ही कंपनी नवी मुंबईमध्ये असून तिथं 10,000 लोक काम करत आहे. 
वर्षाच्या शेवटी रिलायन्स रिटेल ऑनलाइन मोबाईल फोन विकण्यास ही सुरुवात करणार आहे.

या वर्षी रिलायन्स रिटेलनं बिग बाजारलाही मागे टाकलंय. कंपनीची मार्चमध्ये सुमारे 14,496 कोटी रुपये कमाई झालीय. रिलायन्सकडे देशातील सर्वात जास्त रिटेल शो रुम देखील आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.