पनवेल, भिवंडी, मालेगाव पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

तीन महापालिकांसाठी आज मतदान झाले असतानाच आणखी 3 पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. 

Updated: Apr 19, 2017, 06:12 PM IST
पनवेल, भिवंडी, मालेगाव पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर title=

मुंबई : तीन महापालिकांसाठी आज मतदान झाले असतानाच आणखी 3 पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. 

पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव या महापालिकांमध्ये 24 मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये पनवेल या नव्यानं तयार झालेल्या महापालिकेत पहिल्यांदाच मतदान होतंय. 

मतमोजणी 26 तारखेला होईल. या तिन्ही महापालिका क्षेत्रांमध्ये लगेच आचारसंहिता लागू झाल्याचं राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी जाहीर केलं.