नवी दिल्ली: भारतात योगावर अभ्यास करण्यासाठी आलेल्या एका अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ‘पिपली लाइव्ह’ या हिंदी चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारूखी यांच्यावर त्या अमेरिकन महिलेनं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे. त्यामुळं फारूखी यांना बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
कोलंबिया विद्यापीठात पीएचडी करीत असलेल्या ३८ वर्षीय महिलेनं ‘योग’ या विषयाचा शोध घेण्यासाठी गोरखपूर इथल्या गोरक्षनाथ मंदिर, महंत आदित्यनाथ आणि हठयोगाचा विषय निवडला होता. हा शोध घेण्यासाठी वर्षभरापूर्वी ती भारतात आली. तिनं आपल्या भारतीय मित्राच्या माध्यमातून मेसमूद फारूखी यांची भेट घेतली.
गोरखपूरला राहणार्या फारूखीनं तिला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यांनी आपल्या शेजारीच तिला भाड्यानं घर मिळवून दिलं. ते दोघंही नेहमी एकत्र प्रवास करायचे. मग २८ मार्चला नशेत असलेल्या अमेरिकन महिलेचा गैरफायदा फारूखी यांनी घेतला.
या प्रकारानंतर ती महिला अमेरिकेला परतली. मग तिनं अमेरिकेवरून फारूखीच्या वर्तनाला चुकीचं ठरवलं. त्यावर फारूखी यांनी मेल पाठवून अमेरिकन महिलेची माफी मागितली. त्यानंतर १९ जूनला दिल्लीला परतलेल्या अमेरिकन महिलेनं न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये फारूखीविरूद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. त्यामुळं फारूखी यांना पोलिसांनी अटक केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.