पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि इंजिनिअर्सच्या हातात फावडे

कुणाची मदत कधी आणि कशी घेता येईल हे एकदा का प्रशासनाच्या लक्षात आलं की मग काम झालंच म्हणून समजा... मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनाही डोंगरांच्या  कडेकपा-यांत कचरा दिसला... पण तिथली साफसफाई पालिकेच्या कर्मचा-यांनी केली नाही... मग कुणी केली साफसफाई?

Updated: Jul 12, 2014, 11:18 PM IST
पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि इंजिनिअर्सच्या हातात फावडे title=

मुंबई : कुणाची मदत कधी आणि कशी घेता येईल हे एकदा का प्रशासनाच्या लक्षात आलं की मग काम झालंच म्हणून समजा... मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनाही डोंगरांच्या  कडेकपा-यांत कचरा दिसला... पण तिथली साफसफाई पालिकेच्या कर्मचा-यांनी केली नाही... मग कुणी केली साफसफाई?

पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि इंजिनिअर्सच्या हातात फावडे... चकरावलात ना हे ऐकून. पण मुंबईतल्या घाटकोपर परिसरात डोंगर कपा-यात कच-याचं साम्राज्य आहे. पालिका आयुक्त सीताराम कुंटे मेट्रोतून प्रवास करत असताना त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि तातडीनं साफसफाईचे आदेश दिले. पण या अवघड भागांमधली साफसफाई करणार कोण. हा मोठा प्रश्न. अखेर यासाठी सह्याद्री एडव्हेंचर्स क्लबची मदत घेण्यात आली. या संस्थेतल्या डॉक्टर इंजिनिअर्स आणि पोलीस अधिका-यांनी हा भाग स्वच्छ केला.

घाटकोपरमधल्या भीमनगर भागात ही साफसफाई करण्यात आली. आजतर या पोलीस अधिकारी डॉक्टर इंजिनिअर्सनी हातात फावडे घेऊन साफसफाई केली. पण आपला परिसर आपण स्वच्छ ठेवण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी किंबहून कर्तव्यच आहे. 

मेट्रोतून सफर करताना आयुक्तांना हा कचरा दिसला, तसाच मुंबईतल्या इतर भागातला कचराही त्यांना लवकरात लवकर दिसो आणि त्या भागांचीही साफसफाई झटपट होवो हीच अपेक्षा, मुंबईकर करत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.