'स्पा'वर पोलिसांचा छापा, ७ महिला ताब्यात

मुंबईतल्या चेंबुरमधील तंत्र थाई स्पावर रात्री पोलिसांनी छापा टाकून ७ महिलांना ताब्यात घेतलं. यात ६ विदेशी महिलांचा समावेश आहे. 

Updated: Feb 7, 2016, 09:39 AM IST
'स्पा'वर पोलिसांचा छापा,  ७ महिला ताब्यात title=

मुंबई : मुंबईतल्या चेंबुरमधील तंत्र थाई स्पावर रात्री पोलिसांनी छापा टाकून ७ महिलांना ताब्यात घेतलं. यात ६ विदेशी महिलांचा समावेश आहे. 

या विदेशी महिलांना स्पामध्ये काम करण्यासाठी आणण्यात आलं होतं. मात्र त्यांच्याकडून देहविक्रय करवून घेतलं जात होतं. येथील हायप्रोफाईल परिसरात स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून तंत्र थाई स्पावर छापा घातला. याप्रकरणी पोलिसांनी स्पाच्या मॅनेजर आणि दलाला अटक केलीय तर ताब्यात घेतलेल्या महिलांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आलीय.