www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वरळीतल्या अंध उद्योग गृहाची दुरवस्था झी मीडियानं उघड केल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतलीये.
मनसेनं तातडीनं या वसतीगृहात मुलांना मदत पाठवलीये. नव्या गाद्या, उशा आणि पेस्ट कंट्रोलचं साहित्य मनसेनं धाडून दिलंय. आम्ही काल हे वृत्त दाखवल्यावर राज यांनी तातडीनं मदत पोहोचवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर आज तातडीनं ही मदत वसतीगृहात पोहोचती करण्यात आली...
EXclusive- अंध उद्योग गृहाची दुरावस्था, ढेकणांचा सुळसुळाट
वरळीमध्ये असलेल्या एका अंध वसतीगृहात प्रचंड दुरवस्था असल्याचं समोर आलंय... NSD इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड असं या संस्थेचं नाव आहे. या वसतीगृहाची इमारत पूर्ण मोडकळीस आलीये. इथं महाराष्ट्राबरोबरच देशभरातून अंध विद्यार्थी येतात...
जीर्ण झालेलं छतं,मोडकळीस आलेला जिना, भिंतींना ठिकठिकाणी गेलेले तडे ,खिडक्यांना तावदानांचा पत्ताच नाही...अनेक वर्षांपासून बंद असलेल्या एखाद्या भग्न इमारती सारखी इथली परिस्थिती...जनावरांच्या गोठ्य़ापेक्षाही या इमारतीची वाईट अवस्था आहे...मात्र धक्कादायक बाब म्हणजे हे अंधांचं वसहतीगृह आहे..
देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील एनएसडी इंडस्ट्रीयल होम फॉर द ब्लाईंड या संस्थेच्या वसहतीगृहाचं हे कटू सत्य आहे...१८ ते ४० वयोगटातील अंध व्यक्तींना इथं चार वर्षांचं व्यावसायीक प्रशिक्षण दिलं जातं...त्यासाठी समाज कल्याण खात्याकडून एनएसडी संस्थेला अनुदान दिलं जातं...मात्र इथली परिस्थीती पहाता ते अनुदान खरंच या अंध व्यक्तींसाठी खर्च केलं जातं का असा प्रश्न इथली परिस्थीती बघीतल्यानंतर पडल्याशिवाय रहात नाही..इथ अंधांसाठी असलेल्या कॅटवर ढेकणांचा कब्जा,गाद्यांची दुरवस्था, इमारतीतील इलेक्ट्रीकची वायरिंग जूनाट झाल्यामुळे पावसाळ्यात शॉक बसण्याच्या घटना घडतात..
एनएसडीच्या या वसहतीगृहात सध्या पन्नास अंध व्यक्ती असून त्यांच्या या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी ना संस्थेच्या व्यवस्थापनाकडं वेळ आहे ना समाज कल्याण खात्याच्या अधिका-यांकडं वेळ आहे.. झी मीडियाची टीम या वसहतीगृहात पोहचल्याचं समजल्यावर वसहतीगृह व्यवस्थापनाकडून सारवासरव करण्याचा प्रयत्न केला गेला..त्यांची एकच धावपळ उडाली..
मुंबई सारख्या महानगरातील अंधांच्या वसहतीगृहाची ही अवस्था असेल तर ग्रामीण भागातील वसहतीगृहांच काय असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.