राजकारणी तर जादूगारांसारखेच, ९० कोटी कुठे गेले- राज

राज्यातल्या कथित घोटाळ्यांवर प्रथमच उघड भाष्य करताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत मंत्र्यांवर तोंडसुख घेतलं आहे...

Updated: Nov 10, 2012, 09:34 PM IST

www.24taas.com, मुंबई
राज्यातल्या कथित घोटाळ्यांवर प्रथमच उघड भाष्य करताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत मंत्र्यांवर तोंडसुख घेतलं आहे...
दादरमध्ये भूपेन दवे यांच्या मॅजिक अकॅडमीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं. यावेळी राजकारणी आणि जादुगार यांची तुलना करताना दोघंही सारखेच चलाख असतात, असं राज ठाकरे म्हणाले.
राज्यातले ९० हजार कोटी गायब करण्याची जादू नेत्यांनी केली आहे, असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे राज ठाकरे आता घोटाळ्यांवर यापुढे काय बोलणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.