मुंबई : वाळू तस्करी आणि साठीबाजी करणे हा आता अजामीनपात्र गुन्हा करण्यात आला आहे, या गुन्ह्यासाठी १ वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी सरकारने हा जालीम उपाय केला आहे.
राज्यमंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाळू तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आले आहेत.
तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर संबंधित वाळू तस्करांकडून हल्ल्याचे प्रकारही वाढले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.