केईएम हॉस्पिटलमध्ये महिलांचं होतंय लैंगिक शोषण?

मुंबईतलं केईएम हॉस्पिटल सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहे. हॉस्पिटलमध्ये लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप होतोय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 3, 2013, 11:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतलं केईएम हॉस्पिटल सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहे. हॉस्पिटलमध्ये लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप होतोय.
मुंबईचं केईएम हॉस्पिटलमध्ये सध्या महिलांचं लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक आरोप होतोय. एका लॅब टेक्निशियनवर लैंगिक शोषणाचा आरोप हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलांनी केलाय.
लॅब टेक्निशियन अशोक बोखरे त्याच्या मोबाईलमध्ये महिलांचे फोटो काढतो आणि अश्लील संभाषण करतो, असा आरोप आहे. महिलांच्या या तक्रारीनंतर हॉस्पिटलनं चौकशी सुरू केलीय.
देशभरात सध्या लैंगिक शोषणाच्या घटना वाढतायत. केईएम प्रकरणात एकही महिला कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही आणि लॅब टेक्निशियनही बोलायला तयार नाही. उलट आपल्याविरोधात हे षडयंत्र असल्याचा आरोप लॅब टेक्निशियननंच केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.