`मनसे आमदार राम कदम यांची आमदारकी काढून घ्या`

महापालिका अभियंत्यास झालेल्या मारहाणी प्रकरणी मनसे आमदार राम कदम यांची आमदारकी काढून घ्यावी.

Updated: Jan 19, 2013, 05:42 PM IST

www.24taas.com, मुंबई
महापालिका अभियंत्यास झालेल्या मारहाणी प्रकरणी मनसे आमदार राम कदम यांची आमदारकी काढून घ्यावी, `त्यांनी हे नीच कृत्य केलं आहे`त्यामुळे त्यांची आमदारकी काढून घ्यावी अशी मागणी कामगार नेते शरद राव यांनी केली आहे.
अनधिकृत बांधकाम हटवणाऱ्या अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महापौर आणि महापालिका आयुक्तांनी याबाबत कारवाई न केल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही राव यांनी दिला आहे. महापालिका अभियंता मारहाण प्रकरणी कदम यांच्यावर राव यांनी हल्लाबोल केला.
त्यासंदर्भात आमदार राम कदम यांनी `झी २४ तास`कडे बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. `मला आमदारकी काही शरद रावांनी दिलेली नाही, तर ती राज साहेबांनी आणि चार लाख लोकांनी दिलेली आहे. त्यामुळे शरद रावांनी का अभियंत्याची बाजू का घ्यावी हे मला समजत नाही. जो अभियंता महिलांचा विनयभंग करतो अशा अभियंताला पाठीशी घालायचं... त्यामुळे शरद राव यांनी त्या अभियंत्याची बाजू घ्यावी हे काही योग्य नाही.` असं म्हणत आमदार राम कदम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.