टोल कंत्राटदारांकडून नुकसान भरपाईची मागणी

राज्यात गेल्या २४ दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या टोल माफीमुळे  टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 

Updated: Dec 2, 2016, 04:50 PM IST
 टोल कंत्राटदारांकडून नुकसान भरपाईची मागणी  title=

मुंबई : राज्यात गेल्या २४ दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या टोल माफीमुळे  टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 

नोटबंदीचा निर्णयानंतर केंद्राप्रमाणे राज्यातही टोल नाक्यांवर टोल वसुली बंद होती. राज्यातील ६५ टोल नाक्यांवर टोल वसुली बंद होती. राज्यात दिवसाला सरासरी साडे सहा कोटी टोलची वसुली होते.

तीन आठवडे टोल वसुली बंद असल्याने कंत्राटदारांना साधारण 125 कोटी रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. पण कंत्राटदारांना पैसे देण्याऐवजी टोल वसुलीची काल मर्यादा वाढवून देण्याचा विचार सरकार करत आहे.

केंद्राने टोल वसुली बंद केल्यानंतर आणि त्याची मर्यादा दोन डिसेंबरपर्यंत केली. त्याच पावलावर पाऊल टाकत राज्याने पण टोल वसुली बंद निर्णय घेतला होता.

500 आणि 1000 नोटा बंद झाल्यामुळे टोल नाक्यांवर गर्दी वाढत होती , वाद विवाद होत होते, ट्राफिक ची परिस्थिती होत होती म्हणून निर्णय घेतलेला

65 टोल नाक्यांपैकी 53 टोल नाक्यावर छोट्या वाहनांनकडून टोल घेतला जात नाही. फक्त जड आणि मोठ्या वाहनांकडून टोल घेतला जातो. पण इतर 12 टोल नाके जिथे सर्व वाहनांकडून टोल घेतला जातो, ज्यात मुंबई एन्ट्री पॉइंट्स आणि  मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवे यांचा समावेश आहे. 

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचा टोल वसुली ही ऑक्टोबर महिन्यात संपली आहे. तरी नोव्हेंबर २०१६ चे आठ दिवस मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर टोल वसुली करण्यात आली आहे. या संदर्भातील आकडेवारी आयटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी दिली आहे.