सणासुदीच्या काळात डाळीचे दर घसरल्याने दिलासा

डाळीचे दर घसरल्याने मागील वर्षभर महागाईने हैराण झालेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात डाळीचे दर उतरल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 

Updated: Sep 1, 2016, 10:19 AM IST
सणासुदीच्या काळात डाळीचे दर घसरल्याने दिलासा title=

मुंबई : डाळीचे दर घसरल्याने मागील वर्षभर महागाईने हैराण झालेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात डाळीचे दर उतरल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 

सरकारने 95 रुपये किलो दराने डाळ विक्रीची केलेली घोषणा, डाळीचे वाढलेले उत्त्पादन, साठेबाजांवर आणलेलं नियंत्रण यामुळे वर्षभराने का होईना डाळीचे दर ग्राहकांच्या अवक्यात आले आहेत. तर दुसरीकडे डाळींचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत १६५ टक्क्यांनी वाढल्याने आता डाळीचे दर झपाट्याने खाली येत आहेत. त्यामुळे कदाचित डाळ उत्पादक शेतक-यांना मिळणा-या भावात घसरण होण्याची शक्यता आहे. डाळ उत्पादक शेतक-यांची स्थिती कांदा उत्पादक शेतक-यांसारखी होण्याची शक्यता आहे.