साहित्यिकांनी मंत्रालयात परत केले पुरस्कार, पण ३ तास वेटिंग

देशभरात वाढलेल्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ राज्यातल्या साहित्यिकांनी शासकीय पुरस्कार शासनाला परत केले. 

Updated: Oct 23, 2015, 07:02 PM IST
साहित्यिकांनी मंत्रालयात परत केले पुरस्कार, पण ३ तास वेटिंग  title=

मुंबई : देशभरात वाढलेल्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ राज्यातल्या साहित्यिकांनी शासकीय पुरस्कार शासनाला परत केले. 

मंत्रालयातल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातल्या अधिका-यांकडे हे पुरस्कार परत करण्यात आले. साहित्यिकांनी स्मृतीचिन्ह आणि चेकही शासनाला परत केले. 

पुरस्कार परत करण्यांमध्ये प्रज्ञा दया पवार, हरिश्चंद्र थोरात, संभाजी भगत, गणेश विसपुते, मलिंद मालशे, उर्मिला पवार, येशू पाटील, वसंत पाटणकर आणि मुकुंद कुळे यांचा समावेश आहे. 

तत्पूर्वी साहित्यिकांना मुख्यमंत्र्यांच्या दालनात तब्बल 3 तास ताटकळत राहावं लागलं. त्यामुळं उपस्थित असलेल्या साहित्यिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.