पेट्रोल वाचविण्याच्या काही टिप्स!

आपणच आठवा काही वर्षांपूर्वी डिझेल-पेट्रोल दर काय होते? आणि आज ते कुठे पोहोचलेत. आता या सर्वांवर मात करायची कशी? जागतिक प्रश्न सोडवणं आपल्या हातात नाही पण आपण एक महत्त्वाची गोष्ट करू शकतो. ती म्हणजे या इंधनाची बचत. ते मात्र आपल्या हातात आहे आणि त्यामुळे हा प्रश्न नक्कीच सुटेल अगदी नाही म्हटलं तर त्यावर अंकुश नक्कीच राहील.

Updated: May 23, 2012, 10:01 PM IST

आपणच आठवा काही वर्षांपूर्वी डिझेल-पेट्रोल दर काय होते? आणि आज ते कुठे पोहोचलेत. आता या सर्वांवर मात करायची कशी? जागतिक प्रश्न सोडवणं आपल्या हातात नाही पण आपण एक महत्त्वाची गोष्ट करू शकतो. ती म्हणजे या इंधनाची बचत. ते मात्र आपल्या हातात आहे आणि त्यामुळे हा प्रश्न नक्कीच सुटेल अगदी नाही म्हटलं तर त्यावर अंकुश नक्कीच राहील. हा प्रश्न कायमचा सुटेल तेव्हा सुटेल पण आपण अगदीच आपली जबाबदारी झटकू शकत नाही. हे तेल अगदी त्याचा एक थेंबही आपल्याला वाचवता येईल तो कसा ते आज पाहू.
१) गाडीची तब्येत उत्तम असावी

 

सर्वात प्रथम आपली गाडी-तिची तब्येत हे सगळं उत्तम स्थितीत असेल तर. तिचं ट्युनिंग व्यवस्थित असलं पाहिजे. पेट्रोल-डिझेल फिल्टर व्यवस्थित साफ असले पाहिजे. इंजिन ऑइल आणि त्याचे फिल्टर बदली केलेले असले पाहिजेत. टॅपेट सेटिंग, काबोर्रेटरचं सेटिंग, पिस्टन, पिस्टन रिंग बदलणं या सगळ्या गोष्टी उत्तमपणे कार्यरत असतील तर गाडीचा धूरच इंजिनबद्दल माहिती देतो. रंगविरहित धूर हे उत्तम इंजिनचं लक्षणं आहे.
२) गरज असल्यास प्रवास करावा

यानंतर प्रवास करणं, तो कुठल्या कारणासाठी त्याची गरज टाळता येणं शक्य आहे का? हा प्रवास करायचाच असेल, तर कोणत्या वाहनाने हेही ठरवायला हवं.

अगदी साध्यात साधा उपाय म्हणजे आपली गाडी साध्या कारणासाठी न वापरणं. एक किमीपर्यंत पायीच प्रवास करणं. त्यामुळे पायाचा व्यायामही होईल आणि इंधनही वाचेल. म्हणजे दुहेरी फायदा. आपली गाडी जवळच्या रेल्वे स्टेशनपर्यंत ठेऊन पुढे ट्रेनने प्रवास करणंही उत्तम.
३) पूलसिस्टम केल्यास उत्तम

पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येही आता खूप सुधारणा होतायत. गाड्या, बस त्यांच्या वेळा सांभाळल्या तर उत्तम. तीन, चार जणांनी एकत्र पूलसिस्टम केली तरी उत्तम. कामावर गाडी नेण्यासाठी आपल्या एरियातील मित्र-मैत्रिणी किंवा ऑफिसच्या एरियामध्ये आजूबाजूला जाणारी माणसं एकमेकांच्या संगनमताने गेल्यास इंधनाची बरीच बचत होईल.
४) लिकेज चेक करा

प्रत्येक थेंबाची बचत ही मिळकत आहे. वाचवलेले पैसे हीच खरी कमाई. अगदी गाडीतून लिकेज होणारं तेलही लगेच लिकेज बंद करून घेतल्यास फायदाच आहे.

 

 

५) गाडीच्या वेगाचं भान  ठेवावं
गाडी चालवतानाही अनेक गोष्टींचं भान ठेवलं तर बरेच प्रश्न सुटतील. सर्वप्रथम वेगाबद्दल बोलू. ताशी ५०-६० किमी वेगाने गाडी चालवल्यावर सर्वात अधिक इंधन बचत होते. तेच आपण ८०-९० वेगाने गेल्यास ३० ते ४० टक्के इंधन जास्त जळतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अती वेगात चालवल्यास रिअॅक्शनसाठी लागणारा वेळ कमी मिळाल्याने अपघाताची शक्यता वाढते. म्हणून ५०-६० किमी वेगात गाडी चालवणं सवोर्त्तम. म्हणजे दुहेरी बचत होईल.

 

 

६) ब्रेक सिस्टीम चेक करावी
टायरच्या मागे असलेल्या ब्रेक सिस्टममध्ये बिघाड झाल्यासही मायलेज कमी मिळतं. ब्रेक ऑइल लीक होणं, ब्रेक लायनरमधील आणि ब्रेकड्रममधील अंतर, नवीन-जुने पार्ट्स अशा बऱ्याच गोष्टींमुळे आपल्या खिशातील पैसा उगाचच खर्च होतो.