मनसैनिकांची हप्त्यासाठी मारहाण?

घड्याळ विक्रीचं दुकान लावणाऱ्या एका फेरीवाल्याला शस्त्राच्या सहाय्याने जखमी करण्याचा प्रकार मीरारोड स्थानकाबाहेर घडला आहे. मोहम्मद युसूफ आलम असं त्याचं नाव असुन,त्याने हप्ता द्यायला नकार दिल्याने त्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारलं असा आरोप होतो आहे.

Updated: Mar 25, 2012, 06:40 PM IST

www.24taas.com, मुंबई

घड्याळ विक्रीचं दुकान लावणाऱ्या एका फेरीवाल्याला शस्त्राच्या सहाय्याने जखमी करण्याचा प्रकार मीरारोड स्थानकाबाहेर घडला आहे. मोहम्मद युसूफ आलम असं त्याचं नाव असुन,त्याने हप्ता द्यायला नकार दिल्याने त्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारलं असा आरोप होतो आहे.

या हल्ल्यात फेरिवाल्याचं डाव्या हाताचं हाड तुटल आहे तर उजव्या हातावर २५ टाके पडले आहेत. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याच्या तक्रारीवरुन मीरारोड पोलिसांनी सैय्यद अख्तर, सैय्यद अन्वर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वर्षभरापासुन युसूफला दिवसाकाठी ५०० रुपये हप्ता देण्यासाठी मनसे कार्यकर्ते धमकावत होते असा आरोप त्यानं केला आहे. आणि त्याविषयी २०११ मध्ये त्याने मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्याचसोबत मीरारोडच्या उपअधिक्षकांकडे त्याने याविषयी तक्रारवजा निवेदनही दिलं होतं.