अघोरी प्रथा- नवसपूर्तीसाठी महिलांना उलटं टांगतात!

नवसपूर्तीसाठी लोक काय काय करतील, याचा नेम नाही. येवले तालुक्यातील कोटमगावमध्ये नवसपूर्तीचा असाच अफलातून प्रकार सुरू आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 7, 2013, 08:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, येवला
नवसपूर्तीसाठी लोक काय काय करतील, याचा नेम नाही. येवले तालुक्यातील कोटमगावमध्ये नवसपूर्तीचा असाच अफलातून प्रकार सुरू आहे.
नवरात्रौत्सव सुरु असतांना आजपासून कोटमगावच्या जगदंबा मंदिरासमोर महिलांनी स्वत:ला उलटे टांगून नवस फेडायला सुरुवात केलीय. तिस-या माळेपासून सुरू झालेली ही नवसपूर्तीची काहीशी अघोरी प्रथा आता दस-यापर्यंत सुरूच राहणार आहे. आता याला श्रद्धा म्हणायचं की अंधश्रद्धा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. त्याशिवाय नवरात्रौत्सवात स्वतःच घटी बसण्याचीही परंपरा कोटमगावात आहे.
या काळात संपूर्ण ९ दिवस भाविक आपले घरदार सोडून मंदिरात येतात आणि मंदिर परिसरातील भक्त निवासांमध्ये उपवास करीत घटी बसतात. जवळपास २ हजार महिला अशाप्रकारे कोटमगावात घटी बसल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.