शनिशिंगणापुरात महिलेचं बंड

अहमदनगरमधल्या शनी शिंगणापूरमध्ये प्रचलीत चालीरिती विरोधातच बंड पुकारल्याची घटना शनिवारी घडली. 

Updated: Nov 29, 2015, 11:20 AM IST
शनिशिंगणापुरात महिलेचं बंड title=

शनिशिंगणापूर : अहमदनगरमधल्या शनी शिंगणापूरमध्ये प्रचलीत चालीरिती विरोधातच बंड पुकारल्याची घटना शनिवारी घडली. 

एका महिलेनं प्रचलित चालीरीतीविरोधात जाण्याचं धाडस दाखवलं. थेट शनी शिंगणापूर इथल्या चौथ-यावर जाऊन या महिलेनं शनीचं दर्शन घेतलं. शनीच्या चौथ-यावर जाऊन दर्शन घ्यायला महिलांना मनाई आहे. मात्र ही महिला दुपारी चौथ-यावर गेली आणि तिनं तिथे शनीला तेलही वाहिलं. 

दरम्यान या घटननंतर शनी शिंगणापूरमध्ये तणावाचं वातावरण असून गावबंदचा इशारा देण्यात आलाय तसेच गावात निषेध सभेचंही आयोजन करण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.