लाल महालातील शिवतांडव!

शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालात शिरून शाहिस्तेखानाची बोटं तोडली होती. त्यांच्या या ऐतिहासिक पराक्रमाला 18 एप्रिलला 350 वर्षं पूर्ण होत आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 17, 2013, 09:40 PM IST

www.24taas.com, पुणे
पुण्याच्या लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यातून शाहिस्तेखान घाबरून पळाला. मात्र त्याची बोटं मात्र महाराजांनी छाटलीच. या घटनेला उद्या ३५० वर्षं पूर्ण होत आहेत.
शत्रूचा बिमोड करण्यासाठी शिवाजी महाराजांनी वापरलेला गनिमी कावा ही युद्धनितीला जगातील सर्वोत्कृष्ट युद्धनीती समजली जाते. याच गनिमी काव्याने शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालात शिरून शाहिस्तेखानाची बोटं तोडली होती. त्यांच्या या ऐतिहासिक पराक्रमाला 18 एप्रिलला 350 वर्षं पूर्ण होत आहेत.

याच दिवसाचं औचित्य साधत पुण्यात `लालमहालातील शिवतांडव` या नाटकाचा प्रयोग होणार आहे. मोहन शेटे याचं लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या नाटकात शिवरायांची भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारली आहे.