www.24taas.com, झी मडीयिा, पुणे
मुंबई पाठोपाठ पुण्यातही मॅनीक्वीन्सवर बंदी येण्याची शक्यता आहे. मॅनीक्वीनवर बंदी आणण्याच्या प्रस्तावाला सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी मान्यता दिलीय. व्यापा-यांचा मात्र हे पुतळे हटवायला विरोध आहे.
हे पुतळे थो़ड्याच दिवसांत पुण्यातली दुकानं आणि मॉलमधून गायब होणार आहेत. पुणे महापालिका लवकरच या मॅनीक्वीन्सवर बंदी आणण्याची शक्यता आहे. मॅनिक्वीन्सवर बंदीचा प्रस्ताव गटनेत्यांनी मान्य केलाय. त्यामुळे महापालिकेच्या सर्व साधारणसभेतही हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता जास्त आहे.
मॅनिक्वीन्सवर बंदी आणण्याची मागणी सगळ्यात आधी शिवसेनेनं केली होती. व्यापा-यांकडून मात्र या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे.
ब-याच कापड दुकानदारांसाठी मॅनीक्वीन्स हाच जाहिरातीचा मुख्य पर्याय आहे... त्यावरच जर बंदी आणली तर मालाची जाहिरात करायची कशी, असा व्यापा-यांचा प्रश्न आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लवकरत या मॅनीक्वीन्सचं भवितव्य ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.