सनी लियोनसमोर असताना एकता कपूरला प्रपोज

रागिनी एसएमएस २ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकता कपूर आणि सनी लियोन शो कॉमेडी नाइट्सवर होते. कपिल शर्माने प्रेक्षकांना सवाल-जबाव सुरू केले.

Updated: Mar 6, 2014, 06:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रागिनी एसएमएस २ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकता कपूर आणि सनी लियोन शो कॉमेडी नाइट्सवर होते. कपिल शर्माने प्रेक्षकांना सवाल-जबाव सुरू केले.
या चर्चेत एक युवक होता, तो एकता कपूरचा फॅन होता आणि सनी लियोनसमोर होती.
हा युवक धडपडच स्टेजवर आला, सर्वांच्या नजरा त्या युवकासह सनी लियोनकडे होत्या. मात्र भलतंच झालं, त्याने सनी लियोनला सोडून एकता कपूरला प्रपोज केलं.
या युवकाने सुरूवातीला एकता कपूरला एकता मॅडम म्हटलं, नंतर एकता म्हटलं, आणि प्रपोज केलं, एकता कपूरने या युवकाला सनी लियोनला पटवं असं उत्तर दिलं, मात्र या युवकाने एकताचं ऐकलं नाही.
शो नंतर आणखी एक बाब समोर आली, या युवकाला मालिकेत अॅक्टिंगचं काम मिळावं, म्हणून त्याचा एकता कपूरला भाव देण्याचा डाव होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.