शोभा डेंच्या वादग्रस्त ट्विटवर अभिनव, ज्वालाची प्रतिक्रिया

शोभा डे आणि वाद हे जणू आता समीकरणचं बनलंय. शोभा डे यांनी आता ऑलिम्पिक खेळाडूंबद्दल आक्षेपार्ह विधान करत त्यांनी नव्या वादाला तोंड फुटलंय. 

Updated: Aug 9, 2016, 12:01 PM IST
शोभा डेंच्या वादग्रस्त ट्विटवर अभिनव, ज्वालाची प्रतिक्रिया

मुंबई : शोभा डे आणि वाद हे जणू आता समीकरणचं बनलंय. शोभा डे यांनी आता ऑलिम्पिक खेळाडूंबद्दल आक्षेपार्ह विधान करत त्यांनी नव्या वादाला तोंड फुटलंय. 

रिओला जाऊन सेल्फी काढून रिकाम्या हातानं मायदेशी परतण्याचं लक्ष्य भारतीय खेळाडूंचं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी सोशल नेटवर्किंग साऊट ट्विटरवरून केलंय.

यावर क्रीडाजगातातून तर नाराजीचा सूर उमटलाय. शिवाय अनेक सेलिब्रिटींनीही ट्विटरवरुन शोभा डेंवर टीकास्त्र सोडलंय. अभिनव बिंद्रा आणि ज्वाला गुट्टानंही त्यांनी ट्विटरवरून प्रतिउत्तर दिलंय.