अफगाणिस्ताननं घालवली हातातली मॅच

वर्ल्ड टी 20 मध्ये अफगाणिस्ताननं श्रीलंकेविरुद्धची हातात आलेली मॅच गमावली आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेचा 6 विकेटनं विजय झाला आहे. 

Updated: Mar 17, 2016, 11:11 PM IST
अफगाणिस्ताननं घालवली हातातली मॅच title=

कोलकता: वर्ल्ड टी 20 मध्ये अफगाणिस्ताननं श्रीलंकेविरुद्धची हातात आलेली मॅच गमावली आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेचा 6 विकेटनं विजय झाला आहे. 

एकवेळी ही मॅच अफगाणिस्तान जिंकेल असं वाटत असतानाच अफगाणिस्ताननं खराब फिल्डिंग केली आणि श्रीलंकेला एक दोन नव्हे तर तब्बल 3 फोर दिल्या, आणि श्रीलंकेनं ही मॅच 7 बॉल राखून जिंकली. 

श्रीलंकेकडून तिलकरत्ने दिलशाननं 56 बॉलमध्ये 83 रनची खेळी केली. तर श्रीलंकेचे 2 बॅट्समन रनआऊट झाले. 

या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 153 रन बनवल्या. कॅप्टन अजगर स्टॅनिकझाईनं सर्वाधिक 62 रन केल्या. तर समिउल्ला शेनवारीनंही फक्त 14 बॉलमध्ये 31 रन कुटल्या. श्रीलंकेकडून थिसारा परेरानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.