अमेरिकन टेनिस ओपन : मरिन चिलीच, सेरेना विल्यम्स विजेते

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत क्रोएशियाच्या मरिन चिलीच याने पुरूष एकेरीचे विजेतेपद  तर अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने हिन महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले आहे. 

AP | Updated: Sep 9, 2014, 10:20 AM IST
अमेरिकन टेनिस ओपन :  मरिन चिलीच, सेरेना विल्यम्स विजेते title=

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत क्रोएशियाच्या मरिन चिलीच याने पुरूष एकेरीचे विजेतेपद  तर अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने हिन महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले आहे. 

चिलीचने अंतिम सामन्यात जपानच्या केई निशिकोरी याच्यावर 6-3, 6-3, 6-3 असा सरळ सेटमध्ये विजय मिळविला. डोपिंग प्रकरणी एक वर्षांची बंदीची शिक्षा भोगलेल्या चिलीचने जोरदार सर्व्हिस करताना निशिकोरीचा एक तास 54 मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभव केला. चिलीचने पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. त्याने यापूर्वी उपांत्य फेरीत रॉजर फेडररवर मात केली होती. चिलीच हा 2001 नंतर एखादी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा पहिला क्रोएशियन खेळाडू ठरला आहे.  

तर महिला एकेरीचे विजेतेपद जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने पटकाविले. सेरेनाने अंतिम फेरीत डेन्मार्कच्या कॅरोलिनचा 6-3, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजेतेपदासह सेरेनाने आपल्या कारकिर्दीतील 18 वे ग्रँडस्लॅम आहे. यापूर्वी मार्टिना नवरातिलोवा हिने 18 आणि स्टेफी ग्राफने 22 ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविलेली आहेत. सेरेनाचे हे सहावे अमेरिकन ओपनचे विजेतेपद आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.