क्रिकेटर फरार, मोलकरणीला मारहाण, पत्नी अटकेत

 बांगलादेशातील क्रिकेटर कोणत्या ना कोणत्या कौटुंबिक वादात अडकलेले दिसतात. यावेळेस अल्पवयीन मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर शहादत हुसेन अडचणीत सापडला आहे. शहादत हुसेनच्या पत्नीला याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे. तर शहादत हुसेन या प्रकरणानंतर फरार झाला आहे.

Updated: Oct 4, 2015, 09:11 PM IST
क्रिकेटर फरार, मोलकरणीला मारहाण, पत्नी अटकेत title=

ढाका :  बांगलादेशातील क्रिकेटर कोणत्या ना कोणत्या कौटुंबिक वादात अडकलेले दिसतात. यावेळेस अल्पवयीन मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर शहादत हुसेन अडचणीत सापडला आहे. शहादत हुसेनच्या पत्नीला याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे. तर शहादत हुसेन या प्रकरणानंतर फरार झाला आहे.

  
११ वर्षीय मोलकरणीला मारहाण आणि मानसिक छळ केल्याचा आरोप शहादत हुसेन आणि त्याच्या पत्नी यांच्यावर लावण्यात आला आहे. शहादत हुसेनच्या पत्नीला ढाकामधून तिच्या आई-वडिलांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, शहादत हुसेन अद्याप फरार आहे. शहादतला अटक करण्यासाठी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
 
दरम्यान, शहादत आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेला शहादत हुसेन आतापर्यंत ३८ कसोटी सामने आणि ५१ एकदिवसीय सामने खेळला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.