पाकिस्तानचे क्रिकेटपटू मैदानावरच एकमेकांशी भिडले

पाकिस्तान सुपर लीगमधील क्वेट्टा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर झालमी या संघात रविवारी झालेला सामना खेळापेक्षा तेथील अग्ली फाईटमुळेच अधिक चर्चेत राहिला.  

Updated: Feb 15, 2016, 02:30 PM IST
पाकिस्तानचे क्रिकेटपटू मैदानावरच एकमेकांशी भिडले title=

इस्लामाबाद : पाकिस्तान सुपर लीगमधील क्वेट्टा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर झालमी या संघात रविवारी झालेला सामना खेळापेक्षा तेथील अग्ली फाईटमुळेच अधिक चर्चेत राहिला. एरव्ही आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानावर इतर संघाना खुन्नस देणारे पाकिस्तानचे क्रिकेटपटू पीएसएल सामन्यादरम्यान एकमेकांशी भिडले. संपूर्ण व्हिडीओ बातमीच्या खाली आहे. 

रविवारी क्वेट्टा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर झालमी यांच्यात सामना सुरु होता. क्वेट्टाची पाचव्या षटकात ही घटना घडली. वहाब रियाझ गोलंदाजी करत होता तर अहमद शेहजाद फलंदाजीला उभा होता. पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर अहमदने जोरदार षटकार ठोकला.

मात्र त्यानंतरच्या पुढच्या चेंडूत वहाबने त्याला क्लीन बोल्ड केले. अहमद बाद झाल्यानंतर आक्रमक पद्धतीने वहाबने आपला जल्लोष साजरा केला. यावेळी त्याची अहमदशी शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर हे दोघं मारामारीवर उतरले. अखेर पंचांनी मध्यस्थी करत वाद थांबविला. 

पाहा व्हिडीओ

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x