अमेरिकेचा फ्लाईड मेवेदर बॉक्सिंगचा नवा किंग, पॅकियाओवर मात

दोन बॉक्सर , एक रिंग आणि बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात मोठा मुकाबला. लास वेगासच्या MGM ग्रँड मरीनामध्ये हा मुकाबला होतोय. याचं बक्षीस आहे २ हजार कोटी रुपये. अमेरिकेच्या फ्लॉइड मेवेदर ज्यूनिअर आणि फिलिपिंसच्या मॅनी पॅकियाओ यांच्यात हा मुकाबला रंगला. अमेरिकेचा फ्लाईड मेवेदर बॉक्सिंगचा नवा किंग ठरलाय. त्यानं सुपर फाईट्मध्ये पॅकियाओवर मात केलीय. 

Updated: May 3, 2015, 04:33 PM IST
अमेरिकेचा फ्लाईड मेवेदर बॉक्सिंगचा नवा किंग, पॅकियाओवर मात  title=

लास वेगास, अमेरिका: दोन बॉक्सर , एक रिंग आणि बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात मोठा मुकाबला. लास वेगासच्या MGM ग्रँड मरीनामध्ये हा मुकाबला होतोय. याचं बक्षीस आहे २ हजार कोटी रुपये. अमेरिकेच्या फ्लॉइड मेवेदर ज्यूनिअर आणि फिलिपिंसच्या मॅनी पॅकियाओ यांच्यात हा मुकाबला रंगला. अमेरिकेचा फ्लाईड मेवेदर बॉक्सिंगचा नवा किंग ठरलाय. त्यानं सुपर फाईट्मध्ये पॅकियाओवर मात केलीय. 

मॅचच्या बक्षीसाची रक्कम ११४२ कोटी रुपये आहेत. विशेष म्हणजे पराभूत होणाऱ्या बॉक्सरलाही ७६१ कोटींचं बक्षीस मिळणार आहे. मेवेदर जगातील सर्वाधिक कमाई करणारा बॉक्सर आहे. त्याची संपत्ती जवळपास २७ अब्ज रुपये आहे. तर त्याच्याशी भिडणारा पॅक्वेची कमाई २२ अब्ज इतकी आहे. 

भारतीय वेळेनुसार आज सकाळी साडे आठ वाजता हा मुकाबला सुरू होईल. वेल्टरवेट ६७ किला वर्गातील वर्ल्ड चॅम्पियन खिताबासाठी दोघंही आमने-सामने असतील. आतापर्यंतच्या सर्वाधिक बक्षीसासाठी हा मुकाबला होतोय. 

बॉक्सिंग इतिहासातल्या बहुचर्चित लढत काही क्षणांत सुरू होत आहे. 'फाईट ऑफ सेंच्युरी' अर्थात या काळातील सर्वात महामुकाबला म्हणून या बॉक्सिंगकडे पाहिलं जात आहे.
 
फ्लॉइड मेवेदरला आतापर्यंत कोणत्याच प्रोफेशनल फायटरनं हरवलेलं नाही. त्यानं ४७ पैकी २६ लढतीत प्रतिस्पर्धकाला नॉक आउट केलं आहे. दुसरीकडे मॅनी पॅकियाओनं आतापर्यंत ६४ पैकी ५७ लढती जिंकल्या असून त्यातल्या ३८ सामन्यांत प्रतिस्पर्धकाला नॉकआउट केलं आहे.
 
विजेता बॉक्सरला बक्षीसाच्या रकमेसोबतच WBC म्हणजेच वर्ल्ड बॉक्सिंग काउंसिलतर्फे एक बेल्ट दिला जाईल त्याची किंमत जवळ जवळ  ६ कोटी इतकी आहे.
 
लाखोचं तिकीट
 
लास वेगासच्या स्टेडिअमची क्षमता १६ हजार ५०० प्रेक्षक एवढी आहे. यासाठी १ लाख रुपयांपासून ते  ९० लाखापर्यंत तिकिटांचे दर आहेत. बॉक्सिंग रिंग जवळच्या तिकिटांसाठी ६५ लाख रूपये द्यावे लागणार आहेत.
 
इतकंच नाही तर ही चुरस पाहण्यासाठी हॉलिवूडची दिग्गज मंडळी, उद्योगपती रिंगसाईट सीटवर दिसणार आहेत. त्यामुळे सर्वात महागड्या बॉक्सिंग मुकाबल्याचा विजेता कोण होणार याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.