आयपीएल-८मध्ये हे आहे नवं, तुम्हाला ते माहीत आहे का?

आयपीएलचं आठवं सत्र एप्रिलपासून सुरू होणार आहे. आयपीएलचं हे सत्र काही गोष्टींमुळे खास होणार आहे, कारण या सत्रात असं काही होणार आहे जे या आधी आयपीएलमध्ये कधीही झालेले नाही. 

Updated: Apr 9, 2015, 06:31 PM IST
आयपीएल-८मध्ये हे आहे नवं, तुम्हाला ते माहीत आहे का? title=

मुंबई : आयपीएलचं आठवं सत्र एप्रिलपासून सुरू होणार आहे. आयपीएलचं हे सत्र काही गोष्टींमुळे खास होणार आहे, कारण या सत्रात असं काही होणार आहे जे या आधी आयपीएलमध्ये कधीही झालेले नाही. 

मागील सत्रात रॉयस चॅलेंजर्स बेंगलुरूतर्फे खेळलेला भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग या सत्रात दिल्लीतर्फे खेळणार आहे. दिल्लीने युवीला आपल्या टीमकडून खेळवण्यासाठी १६ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याचबरोबर युवराज आयपीएलमधील आजवरचा सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. आजवरचं आयपीएलमधील दिल्लीचं प्रदर्शन एवढं खास नाहीये. त्यामुळे युवराजच्या येण्याने दिल्ली टीममध्ये काय फरत पडेल हे पाहणं उत्सुकतेचं आहे. 

मुंबईतील वानखेडे स्टेडियमने क्रिकेट फॅन्सचा विचार करत, स्टेडियममध्ये 4G वाय-फायची इंटरनेट सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानींच्या टेलिकॉम फर्म रिलायंन्स जिओतर्फे ही सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना लाईव्ह रेकॉर्डींग आणि फोटोज् आपल्या मित्रांना पाठवता येणार आहेत. १७ एप्रिल, २५ एप्रिल, १ मे, ५ मे, १० मे, १४ मे यादिवशी वानखेडेवर मुंबई इंडियन्सच्या मॅच होणार आहेत.

ऑस्ट्रेलियाचा गुरिंदर संधू या आयपीएलच्या सत्रात मध्ये खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूला ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे गुरिंदरचं आयपीएलमध्ये खेळणंही खास असणार आहे. 

ऑस्ट्रेलियाचा यशस्वी कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा रिकी पॉटिंग यावेळी खेळाडू म्हणून नाही तर मुंबई इंडियन्सचा कोच म्हणून आयपीएलमध्ये दिसणार आहे. 

आयपीएल सुरू झाल्यापासुन हे पहिलं सत्र असेल ज्यात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहूल द्रविड, कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने हे आशियातील महान खेळाडू खेळणार नाहीत. या पाचही खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.