क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर : भारत-पाक क्रिकेट सीरिजला परवानगी!

भारत - पाक क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सीरिजला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळालीय. 

Updated: May 14, 2015, 12:08 PM IST
क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर : भारत-पाक क्रिकेट सीरिजला परवानगी! title=

नवी दिल्ली : भारत - पाक क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सीरिजला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळालीय. 

डिसेंबरमध्ये यूएईमध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान सीरिज होणार असल्याची शक्यता यामुळे वाढली आहे. रविवारी पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची भेट घेतली. याचबरोबर आज दिल्लीत बीसीसीआय सेक्रेटरी अनुराग ठाकुर यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर केंद्र सरकारने सीरिजला हिरवा कंदील दिला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. 

'पीसीबी'च्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या सीरिजसाठी पाकिस्तान यजमानपद भूषवेल. पण, ही सीरिज यूएईमध्ये आयोजित करण्यात येईल. 

भारतानं राजनैतिक कारणांमुळे २००७ पासून खासकरून २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत एकही पूर्ण द्विपक्षीय सीरिज खेळली नाही. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेट संबंधांना निलंबित करण्यात आलं होतं. 

दोन्ही देशांदरम्यान डिसेंबर २०१२ मध्ये भारतात तीन वनडे आणि दोन टी-२० मॅचची लघु सीरिज खेळली गेली होती. त्यानंतर या दोन्ही टीम्स आयसीसी स्पर्धेदरम्यान एशिया कपसाठी एकमेकांना भिडल्या होत्या.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.