मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या सेहवागचे 80 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. याच ट्विटमुळे सेहवागनं मागच्या सहा महिन्यामध्ये तब्बल 30 लाख रुपयांची कमाई केली आहे. पण या ट्विटमुळे सेहवागला कमाई कशी झाली याचा उलगडा आम्ही करणार आहोत.
ट्विट करताना अनेक वेळा सेहवागनं वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या नावाचा उल्लेख केला. सेहवागची ही ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यामुळे या ब्रॅण्डच्या कंपन्या सेहवागकडे चेक घेऊन पोहोचल्या. या सगळ्या कंपन्यांचे मिळून सेहवागकडे आता 30 लाख रुपये जमा झाले आहेत. हे पैसे तो त्याच्याच सेहवाग इंटरनॅशनल स्कूलच्या विकासासाठी वापरणार आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये दुसरं त्रिशतक झळकावल्यानंतर हरियाणाचे तेव्हाचे मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडांनी सेहवागला 40 एकर जागा दिली. याच जागेवर सेहवागनं हे इंटरनॅशनल स्कूल उभारलं आहे.