नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायला निघालेला गोळाफेकपटू इंद्रजीत सिंहही उत्तेजक द्रव्यांच्या चाचणीत नापास झालाय.. त्यामुळे नरसिंग यादव पाठोपाठ आता भारतीय ऑलिम्पिकच्या मोहिमेला आणखी एक धक्का बसलाय.
नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं जारी केलेल्या यादीत इंद्रजीत सिंहचं नाव आल्यानं आता त्याची रिओ वारी धोक्यात आलीय. दरम्यान इंद्रजीत सिंह चाचणीत फेल झाल्याबद्दल कुणालाही फारसं आश्चर्य वाटत नाहीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत प्रशिक्षण घेत असताना इंद्रजीत सिंह उत्तेजक पदार्थांचं सेवन केल्याचं पुढे येतंय.