'तेंडुलकरपेक्षाही कोहली लय भारी'

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठलीये. 

Updated: Jan 24, 2016, 10:14 PM IST
'तेंडुलकरपेक्षाही कोहली लय भारी' title=

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठलीये. पण माजी कर्णधार सौरव गांगुलीनं मात्र विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. विराट कोहली हा सचिन तेंडुलकरपेक्षाही चांगला खेळाडू आहे, असं दादा म्हणाला आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या प्रत्येक मॅचमध्ये कोहलीनं उत्तम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये मी अनेकांना खेळताना पाहिलं आहे. सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यामध्ये अव्वल आहेत, पण विराटची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. या शब्दांमध्ये गांगुलीनं कोहलीचं कौतुक केलं आहे. 

दादाची धोनीवर मात्र टीका
एकीकडे दादानं विराटचं तोंडभरून कौतुक केलं आहे, पण धोनीवर मात्र टीका केली आहे. परदेश दौऱ्यावर धोनीच्या कामगिरीमध्ये काहीच सुधारणा झाली नाही, असं तो म्हणाला आहे. संघाच्या परदेशातल्या कामगिरीवरही गांगुलीनं नाराजी व्यक्त केली आहे.