ऑस्ट्रेलियन ओपन : 'मिक्स डबल्स' पेस-हिंगिसच्या नावावर!

भारतीय टेनिसस्टार लिअँडर पेस आणि त्याची पार्टनर मार्टिना हिंगिस यांनं ऑस्ट्रेलियन ओपनतच्या 'मिक्स डबल्स टायटल'ला गवसणी घातली. 

Updated: Feb 1, 2015, 09:13 PM IST
ऑस्ट्रेलियन ओपन : 'मिक्स डबल्स' पेस-हिंगिसच्या नावावर!  title=

मेलबर्न : भारतीय टेनिसस्टार लिअँडर पेस आणि त्याची पार्टनर मार्टिना हिंगिस यांनं ऑस्ट्रेलियन ओपनतच्या 'मिक्स डबल्स टायटल'ला गवसणी घातली. 

पेस आणि हिंगिस जोडीनं फायनलमध्ये फ्रान्सच्या क्रिस्टिना मॅल्डोनविक आणि कॅनडाच्या डॅनियल नेस्टरचा सरळ दोन सेट्समध्ये धुव्वा उडवला. पेस-हिंगिसनं ६-४, ६-३ नं बाजी मारत ऑस्ट्रेलियन ओपनचं मिक्स डबल्स टायटल जिंकलं. एक तास आणि दोन मिनिटं ही मॅच रंगली होती.

४१ वर्षीय लिअँडर पेसचं टेनिस करिअरमधील हे १५ वं ग्रँडस्लॅम ठरलंय. त्यानं आतापर्यंत डबल्सची ८ आणि मिक्स डबल्सची ७ टायटल जिंकली आहेत. पेसचं आपल्या टेनिस करिअरमधील हे २५ वं वर्ष आहे.   

तर दुसऱ्यांदा संन्यास घेऊन पुन्हा मैदानावर परतलेल्या हिंगिसचा हा १० मिक्स डबल खिताब आहे. याशिवाय हिंगिसनं पाच एकल खिताबही जिंकलेत. 

अनुभवी पेसननं गेल्याच वर्षी ३४ वर्षीय हिंगिससोबत जोडी बनवलीय आणि ही जोडी लवकरच ग्रँडस्लॅम खिताब आपल्या नावावर नोंदवण्यात यशस्वी ठरलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.