पी.व्ही सिंधूनं जिंकली इंडियन ओपन सुपर सीरिज

भारताच्या पी.व्ही सिंधूनं इंडियन ओपन सुपर सीरिजवर कब्जा केला. तिनं फायनलमधअये वर्ल्ड नंबर वन स्पेनच्या कॅरोलिना मरिनवर मात केली. 

Updated: Apr 2, 2017, 08:22 PM IST
पी.व्ही सिंधूनं जिंकली इंडियन ओपन सुपर सीरिज title=

नवी दिल्ली : भारताच्या पी.व्ही सिंधूनं इंडियन ओपन सुपर सीरिजवर कब्जा केला. तिनं फायनलमधअये वर्ल्ड नंबर वन स्पेनच्या कॅरोलिना मरिनवर मात केली. 

सिंधूनं 21-19, 21-16 नं बाजी मारत पहिल्यांदाच इंडियन ओपन सुपर सीरिज जिंकली. तर तिच्या बॅडमिंटन करिअरमधील हे दुसरं सुपर सीरिज अजिंक्यपद आहे. याआधी सिंधूनं चायना ओपन सुपर सीरिज जिंकण्याची किमया साधली होती. 

दरम्यान, सिंधूनं मरिनवर मात करत रिओ ऑलिम्पिकमधील पराभवाची सव्याज परतफेड केली. तिनं या मॅचमध्ये सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत केली. मरिनला मॅचमध्ये कमबॅकची संधीच दिली नाही.