रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने सर्वांसमोर केलं प्रपोज

रिओ ऑलिम्पिकमध्ये रविवारच्या दिवशी अनोखे चित्र पाहायला मिळाले. चीनच्या डायवर हे झी हिला तिच्या बॉयफ्रेंडने चक्क सर्वांसमोर लग्नासाठी प्रपोज केले. 

Updated: Aug 15, 2016, 11:25 AM IST
रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने सर्वांसमोर केलं प्रपोज title=

रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये रविवारच्या दिवशी अनोखे चित्र पाहायला मिळाले. चीनच्या डायवर हे झी हिला तिच्या बॉयफ्रेंडने चक्क सर्वांसमोर लग्नासाठी प्रपोज केले. 

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

३ मीटर स्प्रिंगबोर्ड प्रकारात हे झी ला रौप्यपदक मिळाले. यावेळी पदकसोहळा पार पडल्यानंतर उपस्थित क्रीडा चाहत्यांसमोर हे झीचा बॉयफ्रेंड क्विन केई याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

अचानक मिळालेल सरप्राईज पाहून हे झीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. क्विन केईने गुडघ्यावर बसून तिला अंगठी घातली. त्यानंतर सर्वांनी हे झीचे अभिनंदन केले.