close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

परिणीतीऐवजी साक्षी मलिक 'बेटी बचाओ'ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकला कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं.

Updated: Aug 28, 2016, 05:48 PM IST
परिणीतीऐवजी साक्षी मलिक 'बेटी बचाओ'ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

चंदीगड : रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकला कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं. या यशानंतर साक्षीवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. आता हरियाणा सरकारच्या बेटी बचाओ अभियानाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदीही साक्षी मलिकची नियुक्ती झाली आहे. 

मागच्याच वर्षी परिणीती चोप्राची या अभियानाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली होती. पण आता परिणीतीऐवजी साक्षी मलिक बेटी बचाओचा संदेश देताना दिसेल.