साक्षीच्या कामगिरीमुळे वडिलांचं प्रमोशन

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल पटकावलं. साक्षीच्या या कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाबरोबरच बक्षिसांचाही वर्षाव होत आहे.

Updated: Aug 20, 2016, 12:36 PM IST
साक्षीच्या कामगिरीमुळे वडिलांचं प्रमोशन

नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल पटकावलं. साक्षीच्या या कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाबरोबरच बक्षिसांचाही वर्षाव होत आहे. साक्षीच्या या कामगिरीमुळे तिच्या वडिलांचंही प्रमोशन होणार आहे. 

साक्षीचे वडिल सुबिर मलिक दिल्ली परिवहन विभागामध्ये कंडक्टर आहेत. त्यांचं प्रमोशन करण्याबाबतची शिफारस दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी वाहतूक मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडे केली आहे. मनिष सिसोदिया रविवारी मलिक यांच्या कुटुंबाची भेटही घेणार आहेत.