लंडन : भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची वुमेन्स डबल्सची पार्टनर मार्टिना हिंगिसनं विम्बल्डनच्या तिस-या राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केला. अव्वल सीडेड सान्टिनानं जॅपनिज डुओ एरी होजुमी आमि मियू काटोचा 6-3, 6-2 नं धुव्वा उडवला. इंडो-स्विस जोडीनं जॅपनिज जोडीचा अवघ्या 52 मिनिटात धुव्वा उडवला. आता तिस-या राऊंडमध्ये त्यांचा मुकाबला येलेना ओस्टापेनको आणि ख्रिस्टिनी माकेलशी होईल.
लिअँडर पेसचं मेन्स डबल्समधील आव्हान मात्र संपुष्टात आलं. दुस-या राऊंडमध्ये लिअँडर पेस आणि मार्सिन माटकोवस्कीला जॉन पीअर्स आणि हेन्री कोन्टीनेनकडून पराभव स्वीकारावा लागला. इंडो-पोलीशी जोडीला 3-6, 2-6 नं या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 62 मिनिटांमध्ये ऑस्ट्रेलियन जोडीनं ही मॅच आपल्या खिशात घातली.
सेरेना विल्यम्सची विम्बल्डनमधील आगेकूच कायम आहे. अमेरिकेच्या अव्वल सीडेड सेरेनानं जर्मनीच्या अनिका बेकचा 6-3, 6-0 अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. या विजयासह सेरेनानं 22 वं ग्रँडस्लम जिंकण्याच्या दिशेनं आपली वाटचाल सुरु केली आहे.
फ्रान्सच्या जो-विल्फ्रेड-त्सोंगाला आपली मॅच जिंकण्याची कमालीचे कष्ट करावे लागला. त्याला अमेरिकेच्या 18 व्या मानांकित जॉन इसनेरनं कडवी झुंज दिली. त्सोंगानं 4 तास 24 मिनिटं चाललं या मॅचमध्ये 7-6, 3-6, 6-7, 6-2, 19-17 नं अखेर बाजी मारली.