श्रीलंकन बॉलर वेलेगेदोराची टी-२० वर्ल्डकप रेकॉर्डची बरोबरी

श्रीलंकेचा डावखुरा फास्ट बॉलर चनाका वेलेगेदारानं घरगुती क्रिकेच मॅचदरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात स्वस्त गोलंदाजी करण्याच्या वर्ल्डरेकॉर्डची बरोबरी केलीय. 

PTI | Updated: Apr 7, 2015, 10:06 AM IST
श्रीलंकन बॉलर वेलेगेदोराची टी-२० वर्ल्डकप रेकॉर्डची बरोबरी title=

कोलंबो: श्रीलंकेचा डावखुरा फास्ट बॉलर चनाका वेलेगेदारानं घरगुती क्रिकेच मॅचदरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात स्वस्त गोलंदाजी करण्याच्या वर्ल्डरेकॉर्डची बरोबरी केलीय. 

तमिळ यूनियन क्रिकेट क्लबतर्फे खेळतांना वेलेगेदारानं सिंहलीज स्पोर्ट्स क्लब विरुद्ध चार ओव्हरमध्ये दोन रन्स देऊन दोन विकेट घेतल्या. यात दोन मेडन ओव्हरही होते.

यासोबतच वेलेगेदारानं रॅम स्लॅम चॅलेंजरमध्ये गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकाचा फास्ट बॉलर क्रिस मॉरिसच्या रेकॉर्डची बरोबरी केलीय. तमिळ यूनियननं पहिले बॅटिंग करत १४२ रन्स केल्यानंतर एसएससीला केवळ ९७ रन्सवर ऑलआऊट केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.