मेलबर्न: आपल्या देशाचा खेळाडू बाद झाला आहे किंवा नाही, याची वाट प्रेक्षक पाहत असतात, त्यासाठी ते स्टेडियमधील स्क्रीनकडे नजर लावून असतात, त्यानंतर थर्ड अंपायर आपला निर्णय देतो.
पण ग्राऊंडमधील अंपायर आणि पव्हेलियनमध्ये बसलेल्या अंपायरमध्ये नेमकं काय संभाषण झालं, आपल्या खेळाडूला का आऊट दिलं ही शंका प्रेक्षकांमध्ये असते, ही दूर करण्यासाठी आता या दोन्ही अंपायरमधील बोलणं सर्वांना ऐकवलं जाणार आहे. यापुढे आयसीसी पंचांमधला होणारा संवाद टीव्हीवरून प्रसारित करणार आहे.
एखादं अपील, डिसिजन रीव्ह्यू अथवा अंपातर रेफरलनंतर थर्ड अंपायरनी निर्णय कसा घेतला आहे, ते आता टीव्हीच्या प्रेक्षकांना समजेल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमधील वन डे मालिकेत आयसीसीनं हा प्रयोग करून पाहिला होता.
विश्वचषकात बाद फेरीच्या सामन्यांमध्ये अंपायरमधला संवाद टीव्हीवरून प्रसारित केला जाणार असल्याचं आयसीसीनं जाहीर केलं आहे. त्यामुळे मैदानातील पंच आणि थर्ड अंपायरमध्ये नेमकं काय संभाषण होतं, हे आता चाहत्यांनाही ऐकायला मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.