विराट जगातला सर्वात चांगला खेळाडू - मॅक्सवेल

ऑस्ट्रलियाचा धमाकेदार बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल याने विराट कोहली संदर्भात केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देत पुन्हा ट्विट केलं आहे.

Updated: Jan 23, 2016, 08:17 PM IST
विराट जगातला सर्वात चांगला खेळाडू - मॅक्सवेल title=

सिडनी : ऑस्ट्रलियाचा धमाकेदार बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल याने विराट कोहली संदर्भात केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देत पुन्हा ट्विट केलं आहे. त्याने म्हटलं की 'माझ्या ट्विटचा चुकीच्या अर्थ लावला गेला. चांगल्या खेळासाठी मी कोहलीचं कौतूक केलं होत.

'विराट कोहली सारखा जगात दुसरा कोणताच चांगला खेळाडू नाही. आम्हाला माहित आहे की तो मैदानावर काय करु शकतो. त्याने तर कॅनबेरा मॅच आमच्या हातातून काढूनही नेली होती. आमच्यासाठी त्याला रोखणं कठिण होतं. विराट हा चांगला प्रतिस्पर्धी आहे.' असंही मॅक्सवेलने म्हटलं आहे.

प्रत्येक जण विराट सारखं खेळू इच्छितो. प्रत्येकाने त्याच्या आक्रमक खेळाचा आनंद घेतला. मैदानाबाहेर तो खूप चांगला व्यक्ती आहे. असंही मॅक्सवेलने स्पष्टीकरण दिलं.