विराटच्या ‘प्यार के साइट इफेक्ट’ टीम इंडियावर

इंग्लंडमध्ये अपमानजनकरित्या पराभव झाल्यानंतर आता बीसीसीआयने यावर मंथन सुरू केले आहे. मालिका सामन्यामध्ये 1-3 असा पराभव झालेल्या भारतीय संघाची सर्व बाजुंनी आलोचना होत आहे. स्लिपच्या खेळाडूंनी अनेक झेल सोडले. टॉप ऑर्डरचे फलंदाज पूर्णपणे निष्क्रिय ठरले. 

Updated: Aug 21, 2014, 06:34 PM IST
विराटच्या ‘प्यार के साइट इफेक्ट’ टीम इंडियावर title=

लंडन: इंग्लंडमध्ये अपमानजनकरित्या पराभव झाल्यानंतर आता बीसीसीआयने यावर मंथन सुरू केले आहे. मालिका सामन्यामध्ये 1-3 असा पराभव झालेल्या भारतीय संघाची सर्व बाजुंनी आलोचना होत आहे. स्लिपच्या खेळाडूंनी अनेक झेल सोडले. टॉप ऑर्डरचे फलंदाज पूर्णपणे निष्क्रिय ठरले. 

भारतीय संघाचा या पराभवाचा परिणाम खेळाडूंच्या गर्लफ्रेंड आणि पत्नी यांच्यावर पडणार आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार बीसीसीआयने आता ठरवलं आहे की खेळाडू्ंना आता गर्लफ्रेंडला कोणत्याही दौऱ्य़ावर सोबत नेण्याची परवानगी नसणार आहे. एवढंच नाही तर खेळाडूंच्या पत्नी ह्या दौऱ्य़ावर किती वेळ थांबतील हे देखील बीसीसीआय नक्की करण्याच्या तयारीत आहेत.

इंग्लंडच्या मालिका सामन्यात विराट कोहलीचा खराब फॉर्मबद्दल देखील बरीच टीका झाली.  पण या पेक्षाही जास्त टीका बोर्डने त्याला त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माला सोबत नेण्याची परवानगी दिल्याबद्दल झाली.

बीसीसीआयचे एका वरिष्ठ अधिकाऱ्य़ाने सांगितलं की, बोर्ड आता ठरवेल की खेळाडूंची पत्नी विदेशी दौऱ्य़ांवर किती वेळ थांबतील, 'इंग्लंड दौरा आमच्यासाठी डोळे उघडणारा होता. आम्हाला ज्या माहिती मिळाल्या त्यानुसार खेळाडू खेळावर लक्ष देण्याचा जरी प्रयत्न करत असतील तरी त्यांची पत्नी त्यांच लक्ष विचलीत करतात. जेव्हा खेळाडूंना नेट सरावासाठी किंवा जिममध्ये जायचं असतं तरी ते जावू नाही शकत कारण त्याच्या पत्नींना फिरायचं असतं. म्हणून आम्ही विचार केला आहे की इंग्लंड मालिकेनंतर आम्ही खेळाडूंच्या पत्नींना विदेशी दौऱ्य़ावर सोबत राहण्याच्या दिवसांमध्ये घट करणार आहे.'

ऑस्ट्रेलिया आणि ईसीबी विदेशी दौऱ्य़ासाठी खेळाडूंना एक वेळ निश्चीत करून देतात त्या वेळेत ते त्यांच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड सोबत वेळ घालवू शकतात. आता बीसीसीआय देखील असंच करण्याच्या तयारीत आहे.

इंग्लंड दौऱ्य़ासाठी बीसीसीआयने चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, आर अश्विन, स्टुअर्ट बिन्नी आणि गौतम गंभीर यांना त्यांच्या पत्नींना सोबत घेवून जाण्याची परवानगी दिली होती तर विराट कोहलीला अनुष्का शर्माला सोबत नेण्याची परवानगी दिली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.